इतर अभियान

  • homeइतर अभियान

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र डीपी

ग्रामीण भागात कृषिपंप, पीठगिरणी सारखे लहानमोठे उद्योग/दुकाने व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे कनेक्शन एकाच डीपीवर असते. बऱ्याचदा कृषिपंपाचे वा उद्योगांचे बिल भरले न गेल्याने महावितरणकडून डीपीचे कनेक्शन कट केले जाते. जलसाठ्यात पाणी असते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था असते पण केवळ विजेअभावी महिनोंमहिने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना बंद पडतात. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, बऱ्याचदा महिला पाण्यासाठी घरातील मुलांना सोबत घेऊन जातात ज्यामुळे मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.
ग्रामीण भागातील ही अडचण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मतदारसंघातील सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र डीपी उपलब्ध करून देण्याची घोषणा आ अभिमन्यू पवार यांनी केली. आत्तापर्यंत त्यांनी १२५ पेक्षा अधिक पाणीपुरवठा योजनांना स्वतंत्र डीपीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तर उर्वरित योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

समाजमंदिरांना प्रार्थनास्थळे म्हणून विकसित करणे

ग्रामीण भागात वेगवेगळ्या वाड्यावस्त्यांवर समाजमंदिर आहेत. ग्रामीण भागातील समाजमंदिरांचा सामाजिक जडणघडणीसाठी पुरेपूर वापर व्हावा या भावनेतून औसा मतदारसंघातील सर्व समाजमंदिरांना प्रार्थस्थळे म्हणून विकसित करण्याचा संकल्प आ अभिमन्यू पवार यांनी जाहीर केला. यासाठी मतदारसंघातील प्रत्येक समाजमंदिराला ३-५ लक्ष रु. निधी उपलब्ध करून देऊन त्यातून सर्व समाजमंदिरांची दुरुस्ती करणे, सुशोभीकरण करणे, परिसरात वृक्षलागवड करणे, लाईट व्यवस्था उभारणे व बैठक व्यवस्था उभारणे इ. कामे करून समाजमंदिरे प्रार्थनास्थळे म्हणून विकसित करण्यात येत आहेत. आ अभिमन्यू पवार यांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक समाजमंदिर प्रार्थनास्थळे म्हणून विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित समाजमंदिरांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.